तुम्हाला जर वाटत असेल की भारतातील समुद्रकिनारे सुरक्षित आहेत, तर जरा थांबा. दमनचा समुद्रकिनारा सूर्यास्तानंतर अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्यास्तानंतर या किनाऱ्यावर कुणीच थांबत नाही. असं सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी रात्रीच्या वेळी इथं थांबण्याचा प्रयत्न केला, ते तिथून गायब झाले आणि पुन्हा कधीच सापडले नाहीत.