COVID-19: सर्व जगाला प्रतिक्षा, मात्र हे लोक म्हणतात लसच नको; WHOही हादरलं
आम्ही लस घेणार नाही असं म्हणणं हा विचार हा जगातल्या सर्वात मोठ्या 10 धोक्यांमध्ये असल्याचं खुद्द WHOने म्हटलं आहे.
|
1/ 9
जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक प्रगत देशांमध्ये कोरोना लशीच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं असून WHOला त्याची दखल घ्यावी लागली आहे.
2/ 9
जगभरात कोरोनाने आत्तापर्यंत 8 लाखांच्या जवळपास म्हणजे तब्बल 7,88,503 बळी घेतले आहेत. त्यामुळे तातडीने त्यावर औषध शोधण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत.
3/ 9
मात्र औषध शोधण्यात आलं तरीही आम्ही ते औषध घेणार नाही अशी चळवळ आता उभी राहिली असून अनेक प्रगत देशांमध्ये त्याचा प्रसार होत आहे.
4/ 9
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह काही देशांमध्ये अशा प्रकारच्या चलवळींनी जोर धरला असून त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेला घ्यावी लागली आहे.
5/ 9
आम्ही लस घेणार नाही असं म्हणणं हा विचार हा जगातल्या सर्वात मोठ्या 10 धोक्यांमध्ये असल्याचं खुद्द WHOने म्हटलं आहे.
6/ 9
अशा प्रकारच्या लशींची गरज नसून त्यामुळे अनेक आजार उद्भवतात असं या लोकांचं म्हणणं आहे. आपलं शरीरच कुठल्याही आजारावर मात करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा त्यांनी केलाय.
7/ 9
अशी लस आली तरीही ती आम्ही घेणार नाही आणि आमच्या मुलांनाही देणार नाही असा दावाही त्यांनी केलाय.
8/ 9
या चळवळींचा धोका ओळखून अमेरिकेतल्या काही राज्यांनी आणि ऑस्ट्रेलियानेही कायदा करत ही लस घेणं सक्तींचं असणार असल्याचा नियमच केला आहे.
9/ 9
ही लस घेतली नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्य विषयक सवलती मिळणार नसल्याचंही काही देशांनी सांगितलं आहे.