

चीनकडून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांवर उपचार सुरू आहेत. 100 हून अधिक देशांना कोरोनाचा विळखा आहे. भारतात 470 रुग्ण असून महाराष्ट्रात ही संख्या 101 वर पोहोचली आहे.


कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या महामारीत सर्वात जास्त कुणाला त्रास होत असेल तर ते म्हणजे डॉक्टर आणि परिचारिका आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना बरं कऱण्यासाठी त्या अहोरात्र काम करत आहेत. त्यांना संसर्ग होऊ नये यासाटी त्यांना चेहऱ्यावर गॉगल, मास्क आणि संपूर्ण शरीरावर वेगळा ड्रेसकोड चढवावा लागतो.


या डॉक्टरांनी आणि परिचारकांनी जेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे गॉगल आणि मास्क हटवले तेव्हा त्यांचा चेहरा पाहून अंगावर शहारे आले. त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरश: मास्कचे वळ उठले होते आणि सूज आली होती. सतत पेशन्टची काळजी घेण्यासाठी ते व्यस्त होते त्यामुळे त्यांच्या मनावर आणि डोक्यावरही परिणाम झाला आहे.


जगात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे १,,8 deaths. मृत्यूमुखी पडले आहेत आणि तीन लाख thousand० हजारांहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. या विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या उपचारादरम्यान बरेच डॉक्टर देखील संक्रमित झाले आहेत.


कोरोना व्हायरसमुळे 15 हजार 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन लाख 50 हजारहून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टकांनाही या व्हायरसची लागण झाली आहे.


हे फोटो पाकिस्तानमधील खासदार नाज बलोच यांनी आपल्या अकाऊंटवर ट्वीट केले आहेत. त्यांनी Scars for humanity in the line of duty असं कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. त्यांनी अहोरात्र रुग्णांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांना सॅल्युट केला आहे.


पाकिस्तानात आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 800 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. पाकिस्ताननेही आपल्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केलं आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझर्सनेही डॉक्टरांना सॅल्युट केला आहे. आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस मेहनत करून या रुग्णांना बर करण्यासाठी हे डॉक्टर आणि परिचारिका प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.