

अमेरिकेत दररोज सरासरी हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत हा आकडा 50 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या आठवड्यातील दोन दिवस असे होते जेव्हा अमेरिकेत 24 तासांमध्ये 1400 पेक्षा जास्त लोक मरण पावले. ओवा, मिनेसोटा, न्यू मेक्सिको, टेनेसी आणि विस्कॉन्सिन ही अशी राज्ये अशी आहेत जिथे एका आठवड्यात रेकॉर्ड संख्येत मृत्यूची नोंद झाली आहे.


जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महासाथीचे रोज विशेषज्ञ जेनिफर नुजो सांगतात की, परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे आणि येत्या काही वर्षांत ती आणखी बिघडू शकते. ते म्हणाले की, येणारे महिन्यात अधिक धोका निर्माण होण्याची भीती आहे.


अमेरिका जगातील असा देश आहे जिथे कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामधून एकूण 251,256 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये झाले आहेत. भारतात कोरोनामुळे 128,668 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काही आठवड्यांत अमेरिकेत मृतांचा आकडा अधिक वेगाने वाढू शकेल. विस्कॉन्सिन आणि न्यू मेक्सिकोसारख्या राज्यातील आरोग्य अधिकारीदेखील या नवीन परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करीत आहेत.


अहवालानुसार, विस्कॉन्सिन आणि न्यू मेक्सिकोमधील अधिकारी अतिरिक्त बॉडी बॅग आणि मोठ्या रुग्णवाहिकेची तयारी करीत आहे. या राज्यांमध्ये रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढली आहे आणि मेडिकल सिस्टमवर रुग्णांच्या ओव्हरलोडता धोका निर्माण झाला आहे.