कोरोना काळात जग वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत असताना चीन एकामागून एक यश प्राप्त करत आहे. वर्षाच्या सुरूवातीस, चीनने दूसरा सूर्य तयार करण्याबाबत भाष्य केले होतं. आता चीनने असा दूसरा सूर्य बनवल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यानुसार, चीनने बनवलेला हा बनावट सूर्य हा एक प्रकारचे परमाणू फ्यूजन आहे, जो मूळ सूर्यापेक्षा 10 पट जास्त उष्णता आणि प्रकाश देतो, असा दावा केला जात आहे. (सांकेतिक फोटो needpix)
चायना नॅशनल न्यूक्लियर कॉर्पोरेशन (CNNC) यांच्यासह साउथवेस्टर्न इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या वैज्ञानिकांनी 2006 पासून या प्रकल्पावर काम सुरू केले होते. शुक्रवारी या यशाची घोषणा करताना चिनी माध्यमांनी सांगितले की हा सूर्य तयार करण्याचा उद्देश जास्तीत जास्त सौर ऊर्जा मिळविणे आहे. विशेषत: प्रतिकूल हवामानात या सूर्याचा उपयोग होईल. या कृत्रिम सूर्याला HL-2M Tokamak असं नाव देण्यात आलं आहे. (सांकेतिक फोटो Pixabay)
या दिशेने प्रयोगासाठी चीनच्या लेशान शहरात रिअॅक्टर तयार करण्यात आले आणि काम सुरू झाले होते. कृत्रिम सूर्य तयार करण्यासाठी हायड्रोजन गॅस 5 कोटी डिग्री सेल्सिअस तापमानावर करुन, ते तापमान 102 सेकंद कायम ठेवण्यात आले. खऱ्या सूर्यात हीलियम आणि हायड्रोजन सारख्या वायू उच्च तापमानावर क्रिया करतात. या वेळी, ऊर्जा 150 मिलियन डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. म्हणजेच तापमान 15 कोटी डिग्री सेल्सियस आहे. चीनी वृत्तपत्र पीपल्स डेलीच्या म्हणण्यानुसार ते वास्तविक सूर्यापेक्षा 10 पट जास्त उष्णता देण्यास सक्षम असेल. (सांकेतिक फोटो flickr)
हा सूर्य बनवते वेळी परमाणूंना प्रयोगशाळेत विखंडित करण्यात आले होते. प्लाझ्मा रेडिएशनने सूर्याचे सरासरी तापमान तयार केले, त्यानंतर त्या तापमानापासून फ्यूजन प्रतिक्रिया करण्यात आली. या आधारावर, अणूंचे विखंडन झाले, ज्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित केली. या प्रक्रियेची वारंवार पुनरावृत्ती करण्यात आली. (सांकेतिक फोटो पिक्सबे)