एलिझाबेथ द्वितीय ही ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणारी राणी आहे. 96 वर्षीय एलिझाबेथ या सध्याच्या जगातील सर्वात वृद्ध शासक देखील आहेत. त्यांच्या आधी हा विक्रम राणी व्हिक्टोरियाच्या नावावर होता, ज्यांनी 1837 ते 1901 पर्यंत सुमारे 64 वर्षे राज्य केलं. (फोटो- royalfamily@twitter)
एलिझाबेथ II त्यांचे वडील किंग जॉर्ज पाचवे यांच्या निधनानंतर 1952 मध्ये ब्रिटनच्या सिंहासनावर बसल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे वेस्टमिन्स्टर अॅबे येथे झाला. या वर्षी 2 ते 5 जून दरम्यान ब्रिटनमध्ये प्लॅटिनम ज्युबिली सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आलं होतं. 1 जून रोजी एलिझाबेथ यांच्या राजवटीला 70 वर्षे पूर्ण झाली. त्यांचा अधिकृत वाढदिवस 2 जून रोजी होता. त्या आता 96 वर्षांच्या झाल्या आहेत.
राणी एलिझाबेथ यांचा उत्तराधिकारी त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स आहे. मात्र, जोपर्यंत राणी एलिझाबेथ जिवंत आहे, तोपर्यंत चार्ल्स सिंहासनावर बसण्याची शक्यता नाही. चार्ल्स 73 वर्षांचे आहेत. टाईमच्या वृत्तानुसार, चार्ल्स यांचा जन्म एलिझाबेथ यांनी सिंहासनावर बसण्याच्या अवघ्या 3 वर्षांपूर्वी झाला होता. राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत 14 ब्रिटीश पंतप्रधान पाहिले आहेत. अमेरिकेच्या 13 राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.
राणी एलिझाबेथ थायलंडचे राजे भूमिबोल अदुल्यादेज यांच्यानंतर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. राजा भूमिबोल यांनी थायलंडवर 70 वर्षे 126 दिवस राज्य केलं. त्यांनी 1946 मध्ये गादीवर बसले आणि 2016 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते राजा राहिले. 14 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हा राजा भूमिबोल यांचे वय 88 वर्षे होते.
जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्यांपैकी आणखी एक म्हणजे फ्रांझ जोसेफ. तो ऑस्ट्रियाचा राजा होता. 1848 ते 1916 अशी सुमारे 68 वर्षे त्याने राज्य केलं. पहिल्या महायुद्धाच्या मध्यावर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रिया आणि हंगेरी एकाच साम्राज्याचा भाग बनले. फ्रांझ जोसेफ हा ऑस्ट्रियाचा सम्राट आणि हंगेरीचा राजा होता.