मराठी बातम्या » फोटोगॅलरी » विदेश » Japan India Bilateral Maritime Exercise : फायटर जेट, गायडेड मिसाइल्स.... भारताने जपानबरोबर संयुक्त युद्धसराव केल्याने चीन-पाकला झोंबणार मिरच्या?
Japan India Bilateral Maritime Exercise : फायटर जेट, गायडेड मिसाइल्स.... भारताने जपानबरोबर संयुक्त युद्धसराव केल्याने चीन-पाकला झोंबणार मिरच्या?
चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या भारतविरोधी कुरापती बघता आता भारत आणि जपानने अरबी समुद्रात संयुक्त युद्ध अभ्यास (JIMEX) केला. त्यामुळं आता याचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे. पाहा PHOTOS
भारतीय नौदल आणि जपानी नौदलानं अरबी समुद्रात संयुक्त युद्धसराव केला आहे. त्याला JIMEX असं नाव देण्यात आलं होतं. हा सराव 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आला.
2/ 5
भारताचे रिअर अॅडमिरल अजय कोचर यांच्या नेतृत्वाखालील क्षेपणास्त्र आणि युद्धनौकांनी तीन दिवसीय सरावात भारतीय नौदलाचं प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे आता जपान भारताला युद्धसरावात मदत करत असल्यानं चीन आणि पाकिस्तानची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
3/ 5
जपाननेही आपल्या सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स या दलाचं लढाऊ जहाज कागा आणि क्षेपणास्त्र विध्वंसक मुरसेम यासह या युद्धभ्यासात भाग घेतला आहे.
4/ 5
भारताकडून लांब पल्ल्याचं सागरी गस्तीचं विमान P-81 आणि मिग -29 या लढाऊ विमानांसह काही हेलिकॉप्टर देखील या सरावात सहभागी झाले होते.
5/ 5
आता या सरावामुळं याची चर्चा जगभर होत आहे. यावर अजून भारताचे कट्टर प्रतिस्पर्धी चीन आणि पाकिस्तानकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. आता भारतानं या युद्धभ्यासात आघाडी घेतल्याने या दोन देशांच्या भुवया ताणल्या जाणार हे निश्चित.