

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या नव्या पुस्तकातून भारतीय राजकारणातील मुद्द्यांमुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. आपल्या नव्या पुस्तकात अबोमा यांनी असा दावा केला आहे की 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले. (फोटो- AFP)


ओबामा यांनी आपल्या पुस्तकात असा खुलासा केला आहे की, मनमोहन सिंग यांना देशात मुस्लिमविरोधी भावना वाढेल अशी चिंता होती. यामुळे भाजपची ताकद वाढत आहे, म्हणूनच मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली. (फोटो- AFP)


ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांना (मनमोहन यांना) भीती होती की देशातील विरोधक भाजप मुस्लिमविरोधी भावना वाढवत आहेत. त्याचबरोबर ओबामा यांनी असेही म्हटले आहे की राजकीय पक्षांमधील कडवे वाद, विविध सशस्त्र फुटीरवादी चळवळी आणि भ्रष्टाचार घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी अनेक प्रकारे यशस्वी म्हणता येईल. (फोटो- AFP)


याशिवाय ओबामा यांचे 'ए प्रॉमिसिड लँड' हे पुस्तक आठवड्यातून दुसऱ्यांदा चर्चेत आले आहे. ओबामा यांनी आपल्या पुस्तकाच्या एका भागामध्ये सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांचा उल्लेख आहे. (फोटो- AFP)


ओबामांनी राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे. (फोटो- AFP)


याखेरीज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्यांच्यात एक प्रकारची खोल निष्ठा आहे, असे म्हणत त्यांचे कौतुक केले होते. (फोटो- AFP)


राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या व्यतिरिक्त या पुस्तकात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांचाही उल्लेख आहे. (फोटो- AFP)