आपली लैंगिकता अशी जाहीरपणे उघड करण्याचं ठरवलं कारण काही मुलांनी मला पत्रं लिहून त्यांना मिळणाऱ्या हीन वागणुकीविषयी कळवलं. आपल्याला कसे टोमणे मारले जातात आणि वाईट वागणूक दिली जाते, काहींना तर घराबाहेर काढलं जातं हे या मुलांनी कळवलं. त्यातल्या काहींनी तर आत्महत्येचा टोकाचा विचारही केल्याचं कळलं आणि मी समलिंगी असल्याचं जाहीरपणे सांगण्याचं ठरवलं.
टिम कुक म्हणतात, "लैंगिकता ही खासगी गोष्ट आहे आणि खासगीपणाच्या हक्काचा मी पुरस्कर्ता आहे. म्हणून मीसुद्धा समलिंगी असल्याचं आतापर्यंत जाहीरपणे सांगितलेलं नव्हतं. पण या मुलांची परिस्थिती मला कळली आणि मी गे असल्याचं आणि त्यात काही गैर नसल्याचं सांगितल्यानं त्यांना मदत होईल, असं वाटलं. म्हणून मी हे जाहीरपणे सांगतोय."
CNNला दिलेल्या या मुलाखतीत टिम कुक यांनी ट्रंप प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणावरही टीका केली आहे. अमेरिकेनं व्हिसा नियम कडक केल्यामुळे अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या मर्यादेत राहणार आहे. पण स्थलांतराचा फायदा अमेरिकेलाही होतो. देशाच्या उत्पन्नाला हातभार लागतो, असं कुक यांना वाटतं. इमिग्रेशनमुळे GDP वाढतो, असं टिम कुक म्हणाले.