पाकिस्तानमध्ये या कारणामुळं होत आहे चीनविरुद्ध संताप, सरकारलाही लोकांनी धरलं धारेवर.
|
1/ 5
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद शहरात चीन आणि पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत.
2/ 5
या निदर्शनामागचे कारण म्हणजे निलम आणि झेलम नदीवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या धरणांचे बांधकाम. चीनकडून या वादग्रस्त जमिनीवर बांधकाम केलं जात आहे. हे काम चीबंद करण्याची मागणी करत लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
3/ 5
झेलम आणि कोहला नदीवर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. या बांधकामाचा निषेध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी या बांधकामामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधण्यात आलं.
4/ 5
पाकिस्तान आणि चीनकडून या नदींचा ताबा घेत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
5/ 5
चिनी कंपनी आणि पाकिस्तान आणि चीन सरकारदरम्यान कोहला येथे 1125 मेगावॅट हायड्रो पावर प्रोजेक्ट उभारण्यासाठी करार झाला आहे. आता याच कराराविरुद्ध पर्यावरण प्रेमींना आवाज उठवला आहे.