खुलासा! पुतिनचे विरोधक अलेक्सी यांच्यावर अंतर्वस्त्रातून विषप्रयोग; अद्यापही कोमातच
Alexei Navalny Poisoned: जर्मन सरकारने दावा केला आहे की रशियाचे विरोधी पक्ष नेता नेता अलेक्सी नवेलनी (Alexei Navalny) यांना एक अत्यंत भयावह विष देण्यात आलं आहे. यामागे जर्मनी पुतिन सरकारला दोषी मानत आहे.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे प्रमुख विरोधक एलेक्सी नवेलनी (Alexei Navalny) साइबेरियातून एका विमान प्रवासादरम्यान आजारी पडले होते. आता जर्मनीने खुलासा केला आहे की त्यांना नोविचोक (Novichok) नावाचं विष देण्यात आलं होतं. एलेक्सी सध्या कोमात आहेत. (फोटो- AFP)


जर्मनीत राहणारे सोवियत संघाचे माजी वैज्ञानिक असलेले व्लादिमीर उग्लेव यांनी दावा केला आहे की, हे विष अलेक्सीच्या अंतर्वस्त्रात, अंडरशर्ट किंवा सॉक्सच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात पोहोचला. आरोपीने त्यांच्या इनरवेयरवर या विषाचे काही थेंब टाकले (फोटो- AFP)


73 वर्षीय व्लादिमीर उग्लेव यांनी सांगितले की रशियाची गुप्त एजंसीच्या कोणा एजंटला अलेक्सीच्या खोलीत पोहोचणं अत्यंत सोपं होतं. तो व्यक्ती नंतर हॉटेलच्या रुममध्ये शिरला आणि त्यांच्या कपड्यांवर विशेष करुन अंडरवेयरवर विषाचे काही थेंब टाकले. अलेक्सीने ते कपडे घातले आणि त्याच्या शरीरात विष पसरले. (फोटो- AFP)


Alexei Navalny Poisonedनोविचोव नावाचं खास विष दोन वर्षांपूर्वीही खूप चर्चेत होतं. ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या माजी गुप्तचर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीला या विषाने जीव घेण्यात आला होता. (फोटो- AFP)


नोविचोक हे विशेष प्रकारचं रासायनिक शस्त्र आहे. या विषाची खासियत म्हणजे हे सहज लक्षात येत नाही. शीतयुद्धादरम्यान सोवियत संघात फोलिएंट कार्यक्रमाअंतर्गत ही चौथी पिढी रासायनिक शस्त्राच्या श्रेणीच्या 1970-1980 च्या दरम्यान विकसित नर्व एजेंटचा समूह आहे, ज्याला नोविचोक म्हटले जाते (फोटो- AFP)


अनेक तज्ज्ञांनुसार या प्रकारचे विष अनेक वर्षांपर्यंत ठेवलं जाऊ शकतं आणि त्यानंतरही ते तितकेच प्रभावीपणे काम करू शकतं (फोटो- AFP)


रशियाने मात्र अशा विषाचा कट फेटाळला आहे. 44 वर्षीय अलेक्सी नवेलनी राष्ट्रपति व्लादिमीर पुतिनच्या विरोधकांपैकी एक आहे. त्यांना 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. आणि 15 दिवस तुरुंगात पाठविण्यात आले होते. नवेलनीने पुतिनच्या पक्षावर संसदीय निवडणुकीच्यादरम्यान मतदारांनात गोंधळ घालण्याचा आरोप लावला होता आणि आंदोलनही केले होते, ज्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. (फोटो- AFP)


2017 मध्ये नवेलनीवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर एंटिसेप्टिक डाईने हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांच्या डाव्या डोळ्यात 'केमिकल बर्न' झाला होता. गेल्या वर्षी त्यांच्या 'एंटी करप्शन फ़ाउंडेशन'ला परदेशी एजेंट घोषित करण्यात आलं होतं. यामुळे फाऊंडेशनला मोठ्या चौकशीचा सामना करावा लागला होता. (फोटो- AFP)