1994 मध्ये देशात झालेल्या हत्याकांडात सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू झाला. मारले गेलेले बहुतेक तुत्सी जातीचे होते. ऐतिहासिकदृष्ट्या, ते मेंढपाळ आणि गुरेढोरे पाळणारे म्हणून ओळखले जायचे. देश नरसंहारातून सावरत असताना, रवांडाचे सरकार पुन्हा अर्थव्यवस्थेचा विकास आणि कुपोषणाशी लढण्याचा मार्ग म्हणून गायींकडे पाहू लागले आहे
अध्यक्ष पॉल कागमे यांनी 2006 मध्ये "गिरिंका" कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला एक गाय देणे हा आहे. कृषी आणि पशुधन मंत्रालयाच्या मते, या योजनेने आतापर्यंत देशभरात 380,000 पेक्षा जास्त गायींचे वितरण केले आहे. यामध्ये खाजगी कंपन्या, मदत संस्था आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परदेशी नेत्यांच्या योगदानाचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी येथील एका गावात 200 गायी दान केल्या आहेत.