अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) कब्जात आलं आहे. देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि अधिकतर राजकीय नेते देश सोडून पळून जात आहेत. सर्वत्र गोंधळाचं, भीतीचं वातावरण आहे. सर्वसामान्य जनता देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु सर्व रस्ते बंद झाल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. विमानं रद्द करण्यात आल्यानंतर लोक रनवेवर जमले आहेत. एखादं विमान येईल आणि बाहेर पडता येईल या आशेवर ते आहेत. अफगाणिस्तानातील अतिशय विदारक परिस्थिचे फोटो समोर आले आहेत.