PORN फिल्म कलेक्शन नष्ट करणं वडिलांना पडलं महागात, मुलाने मागितली 60 लाखांची भरपाई
मुलाने त्याच्या वडिलांकडे 60 लाखांची मागणी केली आहे. मुलाचा असा आरोप आहे की त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे असणाऱ्या अडल्ट फिल्म्स (Adult Film) कलेक्शन डिलिट केले आहे, ज्याची किंमत 20 लाख रुपये होती


एका मुलाने अडल्ट फिल्म (Adult Film) कलेक्शन डिलिट केलं म्हणून वडिलांकडे 60 लाखांची मागणी केली आहे. . मुलाने मोठ्या संख्येने अडल्ट फिल्म्सचे कलेक्शन केले होते, मात्र वडिलांनी ते नष्ट करून टाकले. (फोटो सौजन्य-न्यूज18 इंग्लिश)


अमेरिकेतील (America)मिशिगन याठिकाणी ही घटना घडली आहे. या मुलाने आपल्या वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आणि 86 हजार डॉलर्स अर्थात 60 लाख रुपयांची भरपाई मागितली. चार्ली नावाचा एक मुलगा आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर ग्रँड हेव्हनमध्ये राहणाऱ्या त्याच्या पालकांच्या घरी रहायला आला होता. तो त्याच्या आईवडिलांच्या घरी 10 महिने राहिला. घरात काहीतरी काम सुरू झाल्यानंतर त्याने ते घर सोडले (फोटो सौजन्य-न्यूज18 इंग्लिश)


यानंतर चार्ली इंडियानामध्ये गेला. काही दिवसांनी चार्लीच्या आई-वडिलांनी इंडियाना याठिकाणी जाऊन त्याचे काही सामान परत केले. मात्र त्यांनी त्याला 12 बॉक्स परत केले नाहीत, ज्यामध्ये अडल्ड फिल्म्सचं कलेक्शन होतं. (फोटो सौजन्य-न्यूज18 इंग्लिश)


जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना त्या बॉक्सबाबत विचारलं तेव्हा त्यांनी ते नष्ट केल्याचं सांगितलं. त्यानंतर चार्लीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की ते कलेक्शन 20 लाखांचं होतं. त्याने वडिलांकडे 60 लाखांची मागणी केली आहे. (फोटो सौजन्य-न्यूज18 इंग्लिश)


चार्लीच्या आई-वडिलांनी असे सांगितले की, त्यांनी 12 बॉक्समधील अडल्ड फिल्म कलेक्शन आणि 2 बॉक्समधील Sex Toys नष्ट केले. चार्लीने त्यांना मेल करून देखील याबाबत विचारणा केली होती. त्याने असे म्हटले होती की तुम्हाला माझ्या वस्तूंची अडचण होत होती तर मला सांगायला हवे होते, मी नसताना त्या नष्ट करायला नको होत्या