[wzslider] 10 सप्टेंबर : आंतराष्ट्रीय मोबाईल मार्केटमध्ये दादा असलेल्या ऍपलने आपला बहुप्रतिक्षित 6एस आणि 6एस प्लस हे दोन नवे आयफोन आज लाँच केले आहे. यासोबतच आयपॅड प्रो, आयपॅड मिनी 4, आणि ऍपल पेन्सिल हेसुद्धा ऍपलने लाँच केलेत. आयफोन 6 एस याआधीच्या आयफोनपेक्षा थोडा बारीक आहे. या फोनमध्ये 'फोर्स टच' हे नवं फिचर आहे. याला '3D टच डिस्प्ले' असंही म्हणतात. यात टच, प्रेस आणि डिपर प्रेस अशा तीन वेगवेगळ्या लेव्हलवरच्या टचमध्ये फरक करता येणार आहे. या फिचरमुळे टच एक्सपिरियंस अधिक चांगला होईल आणि रिस्पॉन्स टाईम कमी होणार आहे. आयफोन 6S मध्ये आयसाईट 12 मेगापिक्सल रियल कॅमेरा आणि फेसटाईम सेंसरसोबत 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. सिल्वर, गोल्ड, स्पाईस ग्रे आणि रोज गोल्ड या चार रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. आयफोन 6 एस या फोनची किंमत 16 जीबीसाठी 649 डॉलर, 64जीबीसाठी 749, आणि 849 128 जीबीसाठी डॉलर इतकी आहे. तर आयफोन 6 एस प्लसची किंमत 16 जीबींसाठी 749 डॉलर, 64 जीबीसाठी 849 आणि 128 जीबीसाठी 949 डॉलर इतकी किंमत आहे. iPhone 6s iPhone 6s Plus Display 4.7-inch Retina HD display 5.5-inch Retina HD display Processor A9 chip with 64-bit architecture; Embedded M9 motion coprocessor A9 chip with 64-bit architecture; Embedded M9 motion coprocessor Operating System iOS 9 iOS 9 Rear camera iSight: 12 megapixel with ƒ/2.2 aperture; 4K recording iSight: 12 megapixel with ƒ/2.2 aperture; 4K recording Front camera FaceTime: 5 megapixel with Retina Flash, HD video recording FaceTime: 5 megapixel with Retina Flash, HD video recording Weight 143 grams 192 grams Thickness 0.28 inches 0.29 inches Others 3D Touch support; Touch ID (2nd gen) 3D Touch support; Touch ID (2nd gen) Colours Silver, Gold, Space Grey, Rose Gold Silver, Gold, Space Grey, Rose Gold Storage 16 GB; 64 GB; 128 GB 16 GB; 64 GB; 128 GB ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv// <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?'http':'https';if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+'://platform.twitter.com/widgets.js';fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, 'script', 'twitter-wjs'); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++