

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी बनून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणांना बेदम चोप देण्यात आला. तृतीयपंथीयांनीच या महिलांच्या वेशात आलेल्या या तरुणांचा पर्दाफाश केला.


महिलांच्या वेशात दोन तरुण तृतीयपंथी बनून महिला आणि तरुणींशी गैरव्यवहार करत होते. एवढंच नाहीतर स्थानिक दुकानदार आणि लोकांनाही पैशासाठी अंगलट येत होते.


या तरुणांचा प्रताप पाहून काही तृतीयपंथींना संशय आला आणि त्यांना याबद्दल जाब विचारला. तेव्हा या तरुणांनी उलटसुलट उत्तर द्यायला लागली. त्यामुळे तृतीयपंथीयांनी या तरुणांना भररस्त्यावर चोप दिला.


तृतीयपंथीयांनी या तरुणाचे भररस्त्यावर कपडे काढले. त्यानंतर हे दोघे तरूण असल्याचं समोर आलं. त्यानंतर लोकांनी आणि तृतीयपंथीयांनी मिळून बेदम चोप दिला.


त्यानंतर या तृतीयपंथीयांनी या तरुणाचे केसही कापून टाकले. एवढं सगळ घडत असताना हे दोन्ही तरूण तिथून पळ काढण्याच्या तयारीत होते. पण, लोकांनी त्यांना पुन्हा पकडले. हे दोन्ही तरूण बिकानेर येथील राहणार होते. या घटनेचा तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.