PHOTOS : विचित्रं टि्वट करून त्याने 9 जणांना संपवलं,घरातच ठेवले मृतदेहांचे तुकडे!
टि्वटरवर स्वत:हाला आत्महत्यापासून रोखणारा एक्सपर्ट असल्याचं सांगून एका 27 वर्षीय सीरियल किलरने तरुण-तरुणींची आपल्या घरी बोलावून निर्घृण हत्या करायचा. जपानच्या टोकियो शहरात राहणाऱ्या या टि्वटर किलरच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचली तेव्हा त्यांना एकच हादरा बसला.


'मला सर्व काही विसरून जायचंय, मला गायब व्हायचं आहे' असं टि्वट शिरायइशी यांने आॅगस्ट 2017 रोजी केलं होतं. त्याचा अर्थ असा होता की, मला आत्महत्या करायची आहे. त्याचीही पोस्ट वाचून एका व्यक्तीने त्याला आत्महत्यापासून रोखण्यासाठी आवाहन केलं. शिराइशीने त्याला आपल्या घरी बोलावलं. जपानची राजधानी टोकियो इथं जामा या भागात त्याचा फ्लॅट आहे. जेव्हा ही व्यक्ती त्याच्या घरी आली तेव्हा शिराइशीने त्याची निर्घृण हत्या केली.


त्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याने टि्वट केले. 'जर आयुष्याच्या टप्प्यावर कुणी अशा ठिकाणी पोहोचलं तिथून पुढे रस्ता नाही आणि आत्महत्या हाच पर्याय असेल मी त्यांची मदत करेन' त्याने स्वत:ला आत्महत्येपासून रोखण्यास मदत करणार असल्याचं सांगितलं. पण याच महिन्यात जेव्हा चार माणसं त्याला भेटली त्यांना आपल्या फ्लॅटवर बोलावून त्यांचा खून केला. असाच प्रकार आॅक्टोबर महिन्यात घडला आणि त्याने आणखी चौघांची हत्या केली.


त्याच्या टि्वटर अकाऊंटवर असे मॅसेज वाचून त्याच्याशी काही युझर्स संपर्क साधत होते. तर तो त्यांना 'चला आपण सोबत आत्महत्या करू' असं आश्वासन द्यायचा. नऊ खून करणाऱ्या शिराइशीने स्वत:ची एक अजब दुनिया तयार केली होती. सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिराईशीने नऊ जणाची हत्या केली. हत्येनंतर प्रत्येक मृतदेहाचे तुकडे केले आणि हे तुकडे घरातच आठ बाॅक्समध्ये बंद करून ठेवले होते.


शिराईशीचा हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नसता. पण त्याने एका 23 वर्षीय मुलीची हत्या केली होती. तिच्या भावाने तिचं टि्वटर अकाऊंट हॅक केलं त्यानंतर घडलेला सगळा प्रकार समोर आला. टि्वटर अकाऊंट हॅक केल्यानंतर शिराईशीने केलेली चॅट समोर आली. त्याने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. शिराईशीची टि्वटरवर दोन अकाऊंट होती. त्यातली एक खाते हे 'हँगिंग प्रो' नावाने होते. या अकाऊंटच्या आधारे पोलीस शिराइशीच्या फ्लॅटवर पोहोचली आणि त्याच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा घडलेला प्रकार पाहुन पोलीस चक्कारावून गेली.


फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत होती, याची तीव्रता इतकी होती की त्यामुळे चक्कर येत होती. त्याच्या घरात काही भयावह वस्तूही होत्या. जेव्हा त्याच्या घराची झाडाझडती घेतली तेव्हा वेगवेगळ्या बाॅक्समध्ये 240 हाडं आणि तुकडे सापडली. या घराला हाॅरर हाऊस म्हणून सांगितलं जातंय. इथं 15 ते 23 वर्षांच्या 8 मुली आणि 1 तरुणाची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडेही घरातच सापडली. शिराइशीला 'टि्वटर किलर' आणि 'सोशल मीडिया किलर' म्हटलं जाऊ लागलं.


पुढील पाच महिने सिरियल किलर ताकाहिरो शिराइशीची मानसोपचार तज्ञांनी तपासणी केली. पण त्यांच्या रिपोर्टमध्ये त्याला कोणताही आजार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आॅर्गेनाइज़ेशन फॉर इकोनॉमिक कॉपरेशन अॅड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त आत्महत्या या जपानमध्ये झाल्या आहे.