

ज्यांच्यामुळे जगात अनेक चांगले बदल झाले अशी अनेक संशोधनं आहेत. अत्यंत कमी साधनसामुग्रीमध्ये संशोधकांनी हे शोध लावून लोकांचं जीवन अधिक सुखकर बनवलं आहे. मात्र यातील अनेक संशोधकांना, संशोधनावेळी आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या शोधकार्यानेच त्यांचा बळी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. (संग्रहित फोटो Pixabay)


विल्यम बुलक (William Bullock) यांनी 19व्या शतकात वेब प्रिंटर मशीन बनवलं. जे अत्यंत जलदगतीने काम करायचं. यात तासाभरात वृत्तपत्राच्या 30 हजार प्रति प्रिंट करणं शक्य होतं. अशाच एका प्रिंटरची दुरुस्ती करताना बुलक यांचा पाय त्यात अडकला, त्यांना बाहेर काढलं. मात्र गॅंगरीन झाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. (संग्रहित फोटो Pixabay)


1910 मध्ये विमानातून, वैमानिकांना दुर्घटनेनंतर सुरक्षित उतरता यावं यासाठी पॅराशूट नव्हतं. त्या वेळी असं सुरक्षित पॅराशूट बनवणाऱ्याला फ्रेंच वैमानिक कर्नल लॉरेन्स यांनी मोठं पारितोषिक जाहीर केलं. Franz Reicheltयाने हे आव्हान स्वीकारलं, पॅराशूट बनवलं मात्र, दोन वर्षांनी त्याने आपल्याच पॅराशूटसोबत आयफेल टॉवरवरून उडी मारली आणि यात पॅराशूट न उघडल्याने त्याचा मृत्यू झाला. (संग्रहित फोटो Pixabay)


अलेक्झांडर बोगदानोव (Alexander Bogdanov) हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. स्वतःला तरुण ठेवण्यासाठी त्यांनी ब्लड ट्रान्फ्यूजनवर प्रयोग सुरू केला होता. त्याने यासाठी एका तरुणाचं रक्त आपल्या शरीरात 11 वेळा टाकलं. मात्र त्या तरुणाला मलेरिया असल्याने अलेक्झांडर यांनाही मलेरिया होऊन त्यांचा मृत्यू झाला. (संग्रहित फोटो Pixabay)


सत्तरच्या दशकात हेन्री स्मोलिंस्की (Henry Smolinski) यांनी कार आणि विमान यांच्यासारखं एक वाहन बनवण्याचं काम हाती घेतलं होतं. फोर्ड पिंटो कार सोबत, Cessna Skymaster या प्लेनच्या विविध भागांना एकत्र करून एक नवीन मॉडेल बनवलं. जमीन आणि आकाश अशा दोन्ही ठिकाणी ते वापरता येत होतं. पण टेस्ट ड्राईव्हच्या वेळी या कारचा उजवा पंखा वाकून जमिनीला लागला आणि या अपघातात या वैमानिकाचा म्हणजे हेन्री यांचा मृत्यू झाला. (संग्रहित फोटो Pixabay)


1910 मध्ये कॅनडा येथे जन्म झालेले लुईस अलेक्झांडर स्लोटी (Louis Alexander Slotin) यांनी मॅनहॅटन येथे एक ऍटम बॉम्ब तयार करण्याचं काम केलं. प्रयोगशाळेत प्लूटोनियम आणि यूरेनियमची क्रिटिकल मास व्हॅल्यू समजण्याच्या प्रक्रियेत प्रयोगशाळेत स्फोट झाला, यात सहकाऱ्यांना वाचवताना ते थेट केमिकलच्या संपर्कात आले आणि रेडिएशनमुळे दोन आठवड्यांत त्यांचा मृत्यू झाला. (संग्रहित फोटो Pixabay)


समुद्रात होणाऱ्या जहाजांच्या अपघातांमुळे हेन्री विंस्टेनली (Henry Winstanley) चिंतेत होते. यावर काम करण्यासाठी त्यांनी लाइट हाऊस बनवण्याचा निर्णय घेतला. 3 वर्षांच्या मेहनातीनंतर एक लाइट हाऊस तयार झालं. त्यावेळी समुद्रातील अपघात कमी झाले. हेन्री यांना आपल्या या नव्या शोधावर पूर्ण विश्वास होता. मात्र 1703 मध्ये ब्रिटन ग्रेट स्टॉर्म हे वादळ आलं. तेव्हा हेन्री लाइट हाऊसमध्येच होते. ते समुद्रातच हरवून गेले, त्यांचा मृतदेह कधी सापडला नाही. (संग्रहित फोटो Pixabay)