

सकाळी उठल्यावर प्रत्येक जण दात ब्रश करायला जातंच ब्रशचे आकार वेगवेगळे असतात. पण आता एक स्मार्ट टूथब्रश आलाय. हा ब्रशच आपोआप तुमचे दात साफ करेल.


हा टूथब्रश अर्थगोलाकार आहे. तो वरच्या आणि खालच्या दातात फिट बसतो. एकदा का वरचे दात साफ झाले की तुम्ही खालच्या दातांना तो लावू शकता. पाच सेकंदात आधी वरचे दात साफ होतील. मग खालचे. नुसते साफ हहोणार नाहीत, तर ते चमकायलाही लागतील.


अमेरिकेच्या लासवेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये फ्रान्सनं या टूथब्रशचा डेमो दिला. सगळ्यांनीच ब्रशला पसंती दिली. त्याला डेंटिसनंही मान्यता दिली. या ब्रशची किंमत 79 डाॅलर्स म्हणजे 5500रुपये आहे.


हा टूथब्रश चार आकारात बनवलाय. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तो दातावर फिट बसवून पाॅवर बटन सुरू करायचं. मग तो व्हायब्रेट होऊन तोंड स्वच्छ होतं. हा ब्रश चार्जही करावा लागतो.


800-900 वर्षांपूर्वी चीनमध्ये असा ब्रश बनला होता. इसवी सन पाच हजार वर्षापूर्वीपासून माणसं दात घासायला लागले होते. भारतात पूर्वी लिंबानं दात साफ करायचे.