onePlus कंपनीच्या स्मार्टफोनची चांगलीच चर्चा झाली. ग्राहकांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. पण आता Xiaomi कंपनीने नवीन स्मर्टफोन लाँच केला आहे जो वनप्लसला टक्कर देऊ शकतो. जाणून घ्या या फोनचे फिचर काय आहेत?
शिओमीने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव Mi Play असं आहे. Play सीरिजचा हा पहिला फोन आहे.
2/ 6
गेल्या आठवड्यात शिओमी कंपनीने या स्मार्टफोनचा टिझर रिलीज केला होता. टिझर पाहून लोकांनी चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.
3/ 6
Xiaomi कंपनीच्या Mi Play हा फोन खास करून डिसप्लेसाठी ओळखला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे. कारण फोनला वॉटरड्रॉप डिसप्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे डिसप्लेवर पाणी पडल्यास फोनला काहीही होणार नाही.
4/ 6
Mi Play फोन लाल, काळ्या आणि निळ्या अशा तीन रंगामध्ये लाँच केलं आहे. त्यासोबतच फोनच्या रिअर पॅनलला ग्रॅडिएंट फिनिशिंग देण्यात आली आहे. Mi Play स्मार्टफोनचा गेमिंग फोन म्हणून जास्त केला जाऊ शकतो.
5/ 6
Mi Play फोनचे फीचर उत्तम आहेत. 5.84 इंच फूल HD डिसप्ले आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोअरेज दिला आहे.त्याचबरोबर 256GB एक्सटरनल स्टोअरेजदेखील फोनमध्ये उपलबद्ध आहे.
6/ 6
तूर्तास या फोनला भारतात लाँच करणार असल्याची कोणतीही माहिती दिली नाही. पण चीनमध्ये या फोनची किंमत अंदाजे 1099 युआन एवढी आहे. भारतीय चलनानुसार 11,000 रुपये इतकी आहे.