कंपनीने हा टीव्ही जेव्हा लाँच केला तेव्हा त्याची किंमत 54,999 रुपये होती. त्यानंतर त्याची किंमत 47,999 अशी ठेवण्यात आली. मात्र आता Mi LED TV 4 Pro ची किंमत आणखी कमी करण्यात आली आहे. कंपनीने 10 हजार रुपये इतकी भारी सूट जाहीर केली आहे. त्यामुळे आता हा टीव्ही तुम्हाला फक्त 44,999 रुपयांत खरेदी करता येईल.
फिचर्स सांगायची झाली तर, Mi LED TV 4 Pro मध्ये 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला 'फ्रेमलेस डिस्प्ले' असं म्हटलं जातं. म्हणून हा जगातला सर्वात पातळ डिस्प्ले असलेला टीव्ही आहे असा दावा Xiaomi ने केला आहे. या टीव्हीची कॉर्नर साइड 4.9 mm ची आहे. तर क्वाड कोअरमध्ये Amlogic Cortex A53 चिपसेट बसवण्यात आला आहे.