हे आहेत Redmi Note 6 Pro चे फिचर्स- Redmi Note 6 Pro मध्ये FHD+ रिझॉल्युशनसह 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम + ६४ जीबी आणि ६ जीबी रॅमला + ६४ जीबी स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. स्टोरेज कॅपॅसिटी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
पहिल्या सेलमध्ये मिळतील अफलातुन ऑफर २३ नोव्हेंबरला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्हाला हा फोन डिस्काऊंटमध्ये मिळेल. ४ जीबी रॅम + ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १२, ९९९ रुपयांना आणि ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १४, ९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय HDFC कार्ड मार्फत हा फोन घेतला तर ५०० रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंटही मिळेल. ही ऑफर २३ नोव्हेंबरसाठीच आहे.