ऑनलाईन शॉपिंगची वाढती प्रसिद्धी पाहता स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या चीनच्या शिओमी कंपनीने भारतात एक शॉपिंग अॅप्लिकेशन लाँच केलं आहे. या अप्लिकेशनला तुम्ही गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
2/ 6
Xiaomi कंपनीच्या नवीन अॅप्लिकेशनवर तुम्हाला ऑनलाईन सर्व वस्तू खरेदी करता येणार आहे. सध्या हे अॅप्लिकेशन अॅण्ड्रॉइड फोनवर उपलब्ध असून लवकरच सर्व युजरसाठी वापरात आणण्यात येईल.
3/ 6
या अॅपच्या मदतीने भारतीय ग्राहकाला चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंना सहजरीत्या खरेदी करता येणार आहे. शिओमी कंपनीचं हे अॅप्लिकेशन तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवर ShareSave नावानं मिळेल.
4/ 6
शिओमी कंपनीच्या या अॅपवर सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री केली जाणार आहे. चीन देश हा विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ओळखला जातो. चीनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात मागवणं सहज शक्य होणार आहे.
5/ 6
या अॅपला शिओमी कंपनीने तीन भागात विभागलं आहे. Payer-up, Drop आणि KickStart अशा पार्टमध्ये विभागणी केली आहे.
6/ 6
यामध्ये ड्रॉपमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर किकस्टार्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, रोबोट बिल्डर अशा वस्तू असतील. त्याचबरोबर पेअर अपमध्ये तुम्ही इतरांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकणार आहात. यामध्ये तुम्हाला बंपर डिस्काऊंटसुद्धा देण्यात येणार आहे.