Xiaomi चा Redmi Go हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सेलची वाट पाहावी लागणार नाही. तो केव्हाही तुम्हाला खरेदी करता येईल. तो कसा आणि कुठे उपलब्ध होईल याची माहीती आम्ही तुम्हाला देणार आहोत...
2/ 7
Xiaomi चा Redmi Go हा स्मार्चफोन तुम्हाल mi.com किंवा फ्लिपकार्ट या वेवसाईटवर खरेदी करता येईल. कॅशबॅक ऑफर असल्यामुळे ग्राहकांना तो आणखी स्वस्तात मिळणा आहे.
3/ 7
Redmi Go किंमत फक्त 4,499 रुपये असून, ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना आकर्षक ऑफर दिली जात आहे. Mi.com या वेबसाईटवरून जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर जियोतर्फे तुम्हाला 2,200 रुपेय कॅशबॅक आणि 100 जीबी इंटरनेट डाटा दिला जाणार आहे.
4/ 7
Redmi Go चा एचडी डिस्प्ले 5 इंच असून, त्यात 1.4GHz का Qualcomm Snapdragon 425 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच 1GB RAM आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची प्रणाली Android 8.1 Oreo Go Edition वर आधारित आहे.
5/ 7
Redmi Go साठी गूगल ने अॅप्स तयार केले आहेत जे या स्मार्टफोनमध्येच उपलब्ध असणार आहेत. या फोनमध्ये असेही काही अॅप्स आहेत, जे इंटरनेटची स्पीड कमी असली तरी तुम्ही सुरू करू शकाल.
6/ 7
या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डबल सिम स्लॉट असून, मायक्रो युएसबी पोर्ट, वायफाय, ब्लुटुथ, 4G LTE यांसह 3,000mAh ची बैटरी देण्यात आली आहे.
7/ 7
Redmi Go मध्ये 8 मेगापिक्सलचा एक रेयर कॅमेरा देण्यात आला असून त्यासोबत फ्लॅश लाईटही देण्यात आला आहे. तसंच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.