

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सातत्याने त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येते. दीर्घकाळापासून कंपनी आणखी एका फीचरवर काम करत आहे.


मल्टि डिव्हाइस फीचर लवकरच युजर्सना वापरता येणार आहे. यानंतर युजर एकच नंबरवरून वेगवेगळ्या फोनमधून WhatsApp ऑपरेट करू शकतात.


व्हॉट्सअॅप संदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetaInfo ने यासंदर्भातील डिटेल्स शेअर केले आहेत.


अहवालानुसार एकाच नंबरवरून एकूण 4 डिव्हाइसमध्ये अकाउंट लिंक करता येईल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपमध्ये लिंक्ड डिव्हाइसेसची नावं वेगवेगळ्या सेक्शनमध्ये देण्यात येतील, ज्यातून माहित राहिल की कोणकोणत्या डिव्हाइसमध्ये एकाच नंबरचे अकाउंट सुरू आहे.


त्याचप्रमाणे कोणत्या डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप शेवटचे अॅक्टीव्ह होते हे देखील पाहता येईल. हे नवीन सेक्शन अॅप मेन्यूमध्ये उजव्या बाजूला दिसेल. याचठिकाणी युजर्सना सेटिंग्स, न्यू ग्रुप, न्यू ब्रॉडकास्ट आणि स्टार्ड मेसेजेसचा पर्याय मिळतो.


नवीन सेक्शनमध्ये युजर्सना नवीन डिव्हाइस लिंक करण्याबरोबरच आधीचे डिव्हाइस कोणते आहेत हे देखील पाहता येतील. WABetaInfo च्या अहवालानुसार android app युजर्सना लवकरच एक नवीन युजर इंटरफेज देखील बघायला मिळेल.


याव्यतिक्त कंपनी अॅडव्हान्स सर्चवर देखील काम करत आहे. हे फीचर सध्या व्हॉट्सअॅप च्या बिटा व्हर्जनमध्ये आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार WhatsApp 2.20.118 Android Beta मध्ये अॅडव्हान्स सर्चचा पर्याय दिला आहे.


सध्या WhatsApp याच्या युजर इंटरफेसवर काम करत आहे. या फीचरअंतर्गत युजर्स मेसेज टाइपच्या माध्यमातून WhatsApp सर्च करू शकतात. याठिकाणी अॅडव्हान्स सर्च मोडमध्ये फोटो, व्हिडीओ, लिंक्स, गिफ्स, ऑडिओ आणि डॉक्यूमेंट्सचा पर्याय बघता येईल.