

जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉटसअॅपवरून पाठवले जाणारे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. याबाबत सिमन्टेकनं संशोधन केलं आहे. व्हॉटसअॅपनं एंड-टू-एंड एनक्रिप्शन दिलं असलं तरी फोटो आणि व्हिडिओ टेक्स्ट मेसेज इतके सुरक्षित नाहीत.


एनक्रिप्शिनमुळं कोणही थर्ड पार्टी युजर मेसेज अॅक्सेस करू शकत नाही. मात्र हे फिचर फक्त टेक्स मेसेजसाठी असल्यानं कोणीही फोटो आणि व्हिडिओ फाइल्सपर्यंत पोहचू शकतं.


अँड्रॉइड अॅप्स डिव्हाइसच्या इंटर्नल किंवा एक्सटर्नल स्टोरेजमध्ये मीडिया फाइल सेव्ह होतात. इंटरनल स्टोरेजशिवाय एक्सटर्नल स्टोरेजचा अॅक्सेससुद्धा अॅपच्या माध्यमातून थर्ड पार्टीला असतो. या मदतीने थर्ड पार्टी अॅप्स मीडिया फाइल शेअर करू शकतात.


संशोधकांचं म्हणणं आहे की, एक्स्टर्नल स्टोरेज डिझाइन एक लूपहोल तयार करतं. याच्या माध्यमातून हॅक व्हॉटसअपचे फोटो आणि व्हिडिओ मिळवू शकतात.


व्हॉटसअॅपवर येणाऱ्या मीडिया फाइल्स एक्सटर्नल स्टोरेजमध्ये डाउनलोड केल्या जातात. यात डाउनलोड केलेले फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टी अॅप्सची परवानगी असलेल्यांना मिळतो. हॅकर सहजपणे डेटापर्यंत पोहचू शकतात आणि याची युजरला पुसटशी कल्पनाही येत नाही.


स्टोरेज लूपहोलच्या मदतीनं हॅकर फक्त फाइलपर्यंत पोहचत नाही तर त्यात बदलही करू शकतो. बनावट अॅपच्या मदतीने व्हॉटसअॅपवर आलेल्या फोटोमध्ये बदलही केला जाऊ शकतो. याचा फटका युजर्सना बसू शकतो.