

WhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय अशा मेसेंजिंग अॅपमध्ये अनेक नवीन फिचर येत आहेत. आता अॅपमध्ये अनेक बदल केले जाणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत WaBetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार WhatsApp ने बीटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी हे नवं डिझाइन उपलब्ध आहे.


नव्या डिझाइनमध्ये व्हॉटसअपच्या सेटींग पर्यायाचे लेआऊट बदलण्यात आलं आहे. WaBetaInfoच्या ट्वीटमध्ये सध्याच्या व्हॉटसअप सेटींगच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Account, Chats, Notification, Payments, Data & Storage, Invite a friend नंतर Help असं दिसतं. नव्या डिझाइनमध्ये याचा क्रम बदलण्यात आला आहे.


याआधी Accounts च्या खाली Privacy, Security, Two-Step verification, change number असं लिहलेलं असायचं. मात्र आता त्याच्यासोबत सिम्बॉलदेखील दिसणार आहे.


चॅट पर्यायात Wallpaper, Chat Backup, Chat History समोर सिम्बॉल आणि Help पर्यायानंतर FAQ, Contact Us, Terms and Privacy Policy, App Info यातही बदल करण्यात आला आहे.


जेव्हा व्हॉटसअप युजर स्वत:च्या प्रोफाईलवर जातील तेव्हा Name, About, आणि Phone अशा कॅटेगरी बघातयला मिळतील. हे अपडेट बीटा व्हर्जनच्या 2.19.45 साठी देण्यात आले आहेत. पुढे वाचा... Whatsapp ने आणलं नवं फिचर, आता 'असं' पाहता येणार व्हिडिओ


WhatsApp नेहमीच आपल्या युजरसाठी नवनवीन फिचर लाँच करत असतं. असंच काहीसं भन्नाट फिचर यावेळीही व्हॉट्सअॅपने आणलं आहे. व्हॉट्सअॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर अनेकदा ती लिंक बफर होत असते.


व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी त्यावर क्लिक केल्यावर दुसरं ब्राऊजर ओपन होतं. पण आता व्हॉट्सअॅपने यात बदल केला असून व्हिडिओचं फिचर अपडेट केलं आहे.


आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅपवर आलेली व्हिडिओ लिंक दुसऱ्या ब्राऊजरवर ओपन न होता त्यावरच पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या फिचरची चाचणी सुरू होती, ती चाचणी यशस्वी झाली असून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाहणं सोपं झालं आहे.


व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या या फिचरला PIP (पिक्चर इन पिक्चर) Mode असं म्हणतात. ज्यामुळे व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन बाहेर न जाता लिंकवरील व्हिडिओ तिथेच पाहता येऊ शकतो.


अॅण्ड्रॉइड फोनमध्ये हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट 2.18.380 व्हर्जनवर काम करतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. याआधी फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडिओ फक्त पाहता येत होत्या पण आता facebook, Youtube, Instagram यावरील व्हिडिओ लिंकसुद्धा व्हॉट्सअॅपमध्ये सहजरित्या पाहता येणार आहेत.