

Vi ने (Vodafone Idea) ग्राहकांसाठी नवा 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्यूसिव्ह (Digital Exclusive) प्लॅन आणला आहे. वोडाफोन-आयडियाने देशभरात आपली ऑनलाईन प्रीपेड सिम डिलिव्हरी सर्व्हिसची (online prepaid sim delivery) व्याप्ती वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.


399 चा रिचार्ज Vi कडून ऑफर केला जाणारा खास प्लॅन आहे. हा 399 चा खास प्लॅन कंपनीकडून ऑफर केल्या जाणाऱ्या दुसऱ्या फर्स्ट रिचार्ज (FRC) प्लॅन्सहून वेगळा आहे. वोडाफोन-आयडियाकडून सध्या 97, 197, 297, 497 आणि 647 रुपयांचे FRC प्लॅन्स ऑफर केले जात आहेत. हे नवे प्लॅन केवळ कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून नवीन सिम ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहेत.


399 रुपयांच्या डिजिटल एक्सक्यूसिव्ह प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा दिला जाणार आहे. या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये एकूण 84GB डेटा दिला जाईल.


कंपनीच्या ऑफलाईन स्टोरमधून नवीन वोडाफोन-आयडिया सिम कार्ड खरेदी करणारे ग्राहक 399 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकत नाही. अशा ग्राहकांना कंपनीच्या पाच फर्स्ट रिचार्ज प्लॅनपैकी एक प्लॅन घ्यावा लागेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 399 रुपयांच्या डिजिटल एक्सक्यूसिव्ह प्रीपेड प्लॅनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 3 दिवसांत 3 लाख ग्राहकांनी यात स्वारस्य दाखवलं आहे.