भारतीय बाजारपेठेत 2018चं वर्ष स्मार्टफोनसाठी फारच दमदार राहिलं आहे. या दरम्यान फोन बनवणाऱ्या कंपन्यांनी एकापेक्षा एक चांगले फिचर असलेले स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामुळे आशा व्यक्त करू शकतो की यंदाही या कंपन्या असेच दमदार फिचर असलेले फोन योग्य किंमतीत बाजारात उपलब्ध करतील. पण या जानेवारी महिन्यामध्ये कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत ते जाणून घ्या.
Honor View 20: चीनची स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या ऑनर कंपनीने नवीन स्मार्टफोन Honor V20 बाजार पेठेत उपलब्ध केला आहे. या फोनचा डिसप्ले फूल HD+6.4 इंच LED आहे. हा स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच करण्यात आला आहे. 6GB रॅम,128GB इंटरनल स्टोअरेज आणि 8GB रॅम, 256GB इंटरनल स्टोअरेज असे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. Honor V-20 फोनमध्ये तुम्ही एक्स्ट्रा मेमरी कार्ड टाकू शकणार नाही. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला Amazoneच्या वेबसाईटवरून खरेदी करावं लागेल. इतर वेबसाईटवर 22 जानेवारीपासून उपलब्ध असेल.
Samsung Galaxy M series: साऊथ कोरीयाची सॅमसंग कंपनी या महिन्यात GalaxyM सीरिजला लाँच करणार आहे. या सीरिजचे Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 तीन दमदार स्मार्टफोन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Galaxy M20 फोन वॉटरड्रॉप आणि 6.3 इंचचा डिसप्ले असेल. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल असेल. 32GB, 35GB इंटरनल स्टोअरेज आणि 3GB रॅमचा हा स्मार्टफोन असणार आहे.
Xiaomi Redmi Pro 2: हा स्मार्टफोन 10 जानेवारीपर्यंत कंपनी लाँच करू शकते. Xiaomi Redmi Pro फोनला शिओमी कंपनीने 2016मध्ये लाँच केलं होतं. या स्मार्टफोनला ग्राहकांनी चांगला प्रतिसादही दिला होता. म्हणूनच Xiaomi Redmi Pro-2 फोनला ग्राहक चांगलाच प्रतिसाद देतील अशी आशा आहे. स्मार्टफोनचा रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. आणि या स्मार्टफोनची रॅम 6GB असेल.