Facebook ने लॉन्च केलं TikTok चं क्लोन! Instagram Reels ने बनवा मस्त व्हिडिओ
हे नवीन फीचर अशा वेळी बाजारात आणलं गेलं जेव्हा चीनच्या प्रसिद्ध TikTok अॅपवर बंदी घालण्यात आली.
|
1/ 7
फेसबुकने TikTokशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन फीचर 'Instagram Reels' लाँच केलं आहे. खरंतर गेल्या महिन्यात इंस्टाग्राम (इंस्टाग्राम) ने त्याच्या 'Reels' फीचरची भारतात चाचणी सुरू केली होती. पण आता हे फीचर अधिकृतपणे लाँच करण्यात आलं आहे.
2/ 7
एकाच वेळी 50 देशांमध्ये हे बाजारात आणण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ज्यात अमेरिका, भारत, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, यू.के., जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांचा समावेश आहे.
3/ 7
मागच्या वर्षी इन्स्टाग्रामने ब्राझीलमध्ये या फीचरची चाचणी करण्यास सुरुवात केली होती आणि काही दिवसांआधी फ्रान्स आणि जर्मनीमध्ये या फीचरवर बारकाईने काम करण्यात आलं.
4/ 7
हे नवीन फीचर अशा वेळी बाजारात आणलं गेलं जेव्हा चीनच्या प्रसिद्ध TikTok अॅपवर बंदी घालण्यात आली. भारत सरकारने गुगल प्ले स्टोअर आणि Apple स्टोअरमधून चिनी अॅप्स काढून भारतात बंदी घातली आहे.
5/ 7
अशाप्रकारे काम करतं Instagram Reels- Instagram Reels हे काही स्टँडअलोन अॅप नाही तर स्वतः इन्स्टाग्रामचे खास फीचर आहे. या अॅपद्वारे, यूजर 15 सेकंदांची मल्टी-क्लिप तयार करू शकतात. या क्लिपमध्ये ऑडिओ, व्हिडिओ आणि नवीन क्रिएटिव्ह टूल्स आहेत.
6/ 7
Reel ला यूजर रील फीड म्हणून पोस्ट करू शकतात आणि ही स्टोरीसारखी शेअर होते. म्हणजेच 24 तासानंतर पोस्ट केलेला व्हिडिओ दिसणार नाही.
7/ 7
Instagram Reels मध्ये ऑडिओ, एआर इफेक्ट्स, टायमर आणि काउंटडाउन, स्लो मोशन आणि फास्ट मोशन असे टूल्स दिले आहेत.