Home » photogallery » technology » THIS FESTIVE SEASON KIA SONET HYUNDAI VENUE AND TATA NEXON TOP CARS YOU CAN BUY UNDER RS 7 LAKH KNOW DISCOUNT OFFER PRICE GH
दिवाळीच्या निमित्ताने पूर्ण करा आलिशान कार खरेदीचं स्वप्नं; 7 लाखांपेक्षा कमी किमतीत 10 गाड्या
फेस्टिव्ह सीजनमध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल, आणि बजेट 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर या गाड्यांचा नक्कीच विचार करू शकता.
|
1/ 11
फेस्टिव्ह सीजनमध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल, आणि बजेट 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर या गाड्यांचा नक्कीच विचार करू शकता.
2/ 11
Kia Sonet - 6.7 लाख रुपये - शहरातील सर्वात लोकप्रिय नवीन एसयूव्ही, किआ सोनेट आधीच काही जास्त विक्री असणाऱ्या गाड्यांना मार्केटमध्ये टक्कर देत आहे. ही गाडी इंजिन आणि ट्रान्समिशन पर्यायांसह अनेक इतर वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.
3/ 11
Hyundai Venue - 6.75 लाख रुपये - हुंदाईची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असून, सोनेटहून अधिक गाड्या विकल्या जात आहे. या गाडीत आयएमटी ट्रान्समिशनसोबत इंजिनच्या पर्यायांचा समावेश असून अनेक इतर अव्वल दर्जाची वैशिष्ट्यं आहेत.
4/ 11
Maruti Suzuki Swift - 5.19 लाख रुपये - मारुती सुझुकी स्विफ्ट ही कंपनीची सर्वात जास्त विक्री झालेली कार आहे. या गाडीची काही वैशिष्ट्यही तिचा खप मोठ्या प्रमाणात वाढवतात. यात मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
5/ 11
Maruti Suzuki Baleno - 5.63 लाख रुपये - मारुती सुझुकी बलेनो ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक असून त्यात स्विफ्टसारखीच सर्व वैशिष्ट्ये आहेत. यातसुद्धा पेट्रोल इंजिन आणि एएमटी व मॅन्युअल ट्रान्समिशन असे दोन्ही पर्याय मिळतात.
6/ 11
Maruti Suzuki S-Presso - 3.70 लाख रुपये - एस-प्रेसोला प्रामुख्याने मारुती सुझुकी एसयूव्ही म्हणतात. एस-प्रेसो ही मारुती सुझुकीच्या सर्वांत आरामदायी गाड्यांपैकी आहे.
7/ 11
Maruti Suzuki Dzire - 5.89 लाख रुपये - मारुती सुझुकी डिझायर ही सुझुकीचीच आणखी एक उत्तम गाडी आहे. स्विफ्टच्या डिझाइनवर आधारित, ही एक सेडान कार आहे.
8/ 11
Tata Altroz - 5.44 लाख रुपये - बलेनोचा थेट प्रतिस्पर्धी म्हणून अल्ट्रोज ही टाटा मोटर्सची प्रीमियम हॅचबॅक गाडी आहे आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत बलेनोची ती कट्टर प्रतिस्पर्धी आहे. अल्ट्रोजमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय आहेत.
9/ 11
Tata Nexon - 6.99 लाख रुपये - टाटाची एसयूव्ही नेक्सॉन ही थेट किआ सोनेट आणि हुंदाई वेन्यूशी स्पर्धा करते.
10/ 11
Honda Amaze - 6.19 लाख रुपये - होंडा अमेझ ही या यादीतील दुसरी सेडान आहे. जरी ही कमी विकली जात असली तरीही, अमेझ अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.
11/ 11
Renault Triber - 5.12 लाख रुपये - रेनॉ ट्रायबरची निर्मिती जागतिक बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी भारतासाठी केली गेली होती. ही एक 7-सीटर कार आहे जिची संपूर्ण बूट स्पेस 625 लिटरपर्यंत वाढवली जाऊ शकते.