टेक्नॉलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) इंटरनेट एक्सप्लोरर 11 (IE11) आणि एज ब्राउजर (Edge Browser) बंद करणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर यूजर्स इंटरनेट एक्सप्लोरर 11 वर मायक्रोसॉफ्ट 365 अॅप्स आणि सर्विसेस कनेक्ट करू शकणार नाही. मायक्रोसॉफ्टने सांगितले की कंपनी 17 ऑगस्ट 2021 पासून इंटरनेट एक्सप्लोरर 11 ला सपोर्ट करणे बंद करण्यात येईल.
इंटरनेट एक्सप्लोरर 11 ला बंद करण्याची प्रक्रिया या वर्षी 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. यानंतर मायक्रोसॉफ्ट 365 अॅप्स आणि सर्विसेस 17 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणाऱ्या ब्राउजरला सपोर्ट करणार नाही. एज ब्राउजर मार्च 2021 मध्ये बंद होईल. याच्या 7 महिन्यांनंतर मायक्रोसॉफ्ट क्रोमियम बेस्ड एज ब्राउजर सादर करण्यात येईल जी विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व स्पोर्टेड वर्जनमध्ये मिळेल. कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की सपोर्ट बंद झाल्यास इंटरनेट एक्सप्लोरर 11 पूर्णपणे बंद होणार नाही. हा अॅप आताही काम करेल.