इंटरनेटचा शोध लागल्यानंतर ज्यावेळी ते जगभरात पसरू लागलं होतं, तेव्हाच असं म्हटलं जात होतं, की एक दिवस असा येईल ज्यावेळी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं इंटरनेटशी जोडली जातील. आता इंटरनेटशी जोडले जाऊन आपल्याकडील मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीन अशी उपकरणं ‘स्मार्ट’ होत आहेत. यातच आता घरातील लाईट बल्बही मागे नाहीत. बाजारात सध्या असेही लाईट बल्ब (Smart LED light bulbs) मिळत आहेत, जे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने चालू किंवा बंद करू शकता. एवढंच नाही, तर त्यांचा प्रकाश कमी-जास्त (Features of smart led bulbs) करणं किंवा रंग बदलण्यासारखे पर्यायही उपलब्ध आहेत. म्हणजे या बल्बचा रंगीत प्रकाश पडतो. (फोटो सौजन्य :shutterstock)
बाजारात अनेक प्रकारचे आणि अनेक कंपन्यांचे स्मार्ट बल्ब उपलब्ध आहेत. मात्र, काही बल्ब असेही आहेत जे दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असण्यासह त्याची किंमतही कमी आहे. यांपैकीच एक म्हणजे, फिलिप्सचा (Philips smart LED bulbs) वीज स्मार्ट वायफाय एलईडी कलर बल्ब. विशेष म्हणजे, हा बल्ब तुम्ही साधारण बल्बच्या सॉकेटमध्येही बसवू शकता. यामुळे याच्या इन्स्टॉलेशनसाठी (Smart LED installation) विशेष खर्च करण्याची गरज नाही. या बल्बला गुगल असिस्टंटमार्फतही नियंत्रित करता येऊ शकतं. (फोटो सौजन्य :shutterstock)
या बल्बचं वैशिष्ट्य म्हणजे, यात विविध रंगांसोबतच (Smart LED wifi colour bulb) स्पेशल इफेक्टचा पर्यायही मिळतो. अलार्म लावल्याप्रमाणे याचे इफेक्ट्स शेड्यूलही करता येतात. अशा प्रकारचे फीचर्स असणाऱ्या इतर स्मार्ट एलईडी बल्बच्या तुलनेत त्याच्या बल्बची किंमत कमी (Cheapest smart LED bulb) असल्याचा दावा फिलिप्स कंपनीने केला आहे. हा बल्ब गुगल असिस्टंट सोबतच अॅमेझॉनच्या अॅलेक्सा, अॅपलच्या सिरी, सॅमसंगच्या स्मार्ट थिंग्ज अशा अॅप्स आणि असिस्टंटनाही सपोर्ट करतो. या अॅप्सचा वापर करुन या बल्बला बोलूनही सूचना देता येतात. (फोटो सौजन्य :shutterstock)
स्मार्ट बल्बसाठी, क्री लायटिंग कनेक्टेड मॅक्स ट्यूबनेल व्हाईट प्लस कलर बल्ब हा दुसरा एक पर्याय आहे. यामध्येही शेड्यूलिंगचा पर्याय मिळतो. पण याचा ब्राईटनेस (Brightness) एका ठराविक मर्यादेपर्यंतच कमी करता येतो. तसंच, फिलिप्सच्या तुलनेत यात कमी प्रमाणात रंग उपलब्ध आहे. हा बल्बही अॅलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट यांना सपोर्ट करतो. पण, सॅमसंग स्मार्टथिंगला हा सपोर्ट करत नाही. (फोटो सौजन्य :shutterstock)
यीलाईट स्मार्ट एलईडी बल्ब हा आणखी एक स्मार्ट बल्ब आहे. यामध्ये साधारणपणे एखाद्या स्मार्ट बल्बमध्ये मिळणारे सर्व फीचर्स आहेत. याशिवाय काही वेगळे फीचर्सही मिळतात. यापैकी एक म्हणजे, आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने एखादा रंग स्कॅन करुन, तो या बल्बला देऊ शकता. म्हणजे तुम्ही स्कॅन करून सेट केलेल्या रंगाचा प्रकाश हा बल्ब देतो. मात्र, यातही तुम्हाला रंगांचे जास्त पर्याय उपलब्ध होत नाहीत. हा बल्ब तुम्ही घरच्या वाय-फायला (Smart Led bulb Wi-fi) जोडू शकता. तसंच, विविध स्मार्टफोन्समधील अॅप्सचा वापर करुन तुम्ही याला सूचना देऊ शकता. (फोटो सौजन्य :shutterstock)