

नवीन वर्षात जर तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगचा फोन घेणाऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने गॅलक्सी सीरीजमधील दोन स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली आहे. Samsung GalaxyJ6 आणि J4 Plus या दोन फोनची किंमत कमी झाली आहे.


Samsung Galaxy J6 Plus या स्मार्टफोनचा डिसप्ले 6 इंचचा इन्फिनिटी डिसप्ले असून हा फोन Android Orio आहे. या फोनचा कॅमेरा उत्तम आहे. यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्याला 13 मेगापिक्सचा प्रायमरी सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आहे. त्याचबरोबर फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.


Samsung Galaxy J6 Plus स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजारांनी घट झाली आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,990 रुपये इतकी होती. आता हा फोन तुम्हाला 12,990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.


Samsung Galaxy J4 Plus : या स्मार्टफोनचा डिसप्ले 6 इंचचा फूल HD डिसप्ले आहे. फोनचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.