फ्रान्सची असलेली कार कंपनी रेनॉने भारतीय बाजारपेठेत अनेक मॉडेल्स उतरवली आहेत. यातली रेनॉ क्विड आणि डस्टर या कार लोकप्रिय आहेत. भारतात बीएस6 एमिशन नॉर्म लागू होणार असल्यानं बीएस4 वाहनांवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
2/ 5
रेनॉची भारतातील सर्वात स्वस्त MPV पैकी एक असलेली ट्रायबर ही कार आहे. या कारवर कंपनीने 10 हजार रुपयांचा लॉयल्टी डिस्काउंट तर 5 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.
3/ 5
कंपनीची सर्वात लोकप्रिय असलेल्या क्वीडच्या प्री फेसलिफ्ट बीएस4 व्हर्जनवर 50 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर 4 हजारांचा कार्पोरेट डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा लॉयल्टी डिस्काउंट मिळणार आहे.
4/ 5
रेनॉची प्रीमियम लुकिंग एसयुवी कार असलेली कॅप्चरवर 2 लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. कारच्या बीएस4 व्हर्जनवर 20 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांचा रुरल कस्टमर बेनिफिट मिळत आहे.
5/ 5
डस्टर कारवर 2 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 20 हजार रुपायांचा लॉयल्टी डिस्काउंट देण्यात येत आहे.