JioGlass Unveiled : आता मीटिंगमध्ये मिळणार 3D अनुभव! जाणून घ्या JioGlass चे खास फिचर्स
जिओने सादर केलेला जादूचा चष्मा पाहिलात का? जाणून घ्या त्याचे खास फिचर्स आणि किंमत.
|
1/ 7
रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी (RIL Chairman Mukesh Ambani) यांनी जिओ 5G रोडमॅपचे अनावरण केले. 5G बरोबर जिओनं स्मार्ट ग्लास नावाचा एक चश्माही लॉंच केला आहे.
2/ 7
मुख्य म्हणजे या चश्म्याच्या मदतीनं तुम्हाला 3D भेटीचा अनुभव घेता येणार आहे. या चश्म्याला JioGlass असे नाव देण्यात आले आहे.
3/ 7
यात स्पीकर आणि माइक दोघांचा सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट ग्लासच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंगचाही लाभ घेता येणार आहे.
4/ 7
भारतात आतापर्यंत ही भन्नाट सेवा देणारी जिओ पहिली कंपनी आहे. या ग्लासचे आज अनावरण करण्यात आले. याची किंमत कितीपर्यंत असणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. या चश्म्याची किंमत 30 हजारांच्या खाली असण्याची शक्यता आहे.
5/ 7
जिओ ग्लासचे वजन 75 ग्रॅम असेल. हा एक व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव देणारा चश्मा आहे. JioGlassला कनेक्ट करण्यासाठी एकच केबल आहे.
6/ 7
JioGlassमध्ये आधीपासूनच यात 25 अॅप्स आहेत जे व्हिडीओ मीटिंग्ससाठी उपयोगी ठरतात. जिओ ग्लास एक केबलसह आला आहे जो आपण आपल्या स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता.
7/ 7
जिओ ग्लास 3D मीटिंग्ज आणि व्हिडीओ कॉलसाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे मुलांना 3D पद्धतीने शिक्षण देता येऊ शकते.