Reliance AGM मध्ये ने JIO 5G चा धमाका; या 10 गोष्टींमुळे होणार नवी क्रांती
Reliance AGM 2021: भारतात 5G ची सुरुवात रिलायन्स जिओच करील, अशी ग्वाही मुकेश अंबानी यांनी या सर्वसाधारण सभेत दिली.
|
1/ 10
1. रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM)सर्वांत मोठी घोषणा झाली 5G फोनची. Jio Phine Next गुगलच्या सहकार्याने तयार केला आहे. तो येत्या 10 सप्टेंबरला लाँच होईल, अशी घोषणआ मुकेश अंबानी यांनी केली.
2/ 10
2. गेल्या वर्षभरात रियान्सने 75 हजार नव्या नोकऱ्या दिल्या. मुकेश अंबानी यांनी सांगितलं की त्यांची ही कंपनी देशात सर्वाधिक GST, VAT आणि इन्कम टॅक्स भरणारी कंपनी आहे.
3/ 10
3. गेल्या वर्षभरात रिलायन्सचा एकत्रित रेव्हेन्यू 5,40,000 कोटी रुपये एवढा होता. यातले इक्विटी कॅपिटलमधून 3.24 लाख कोटी रुपये आले. रिलायन्सच्या शेअर होल्डर्सना गुंतवणुकीतून चौपट रिटर्न मिळाले.
4/ 10
4. मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये सांगितलं की वर्षभरात त्यांचा व्यापार अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. अत्यंत वाईट परिस्थितीतही हा फायदा झाला आणि त्यातून मानवतेच्या सेवेसाठी कोरोना काळात रिलायन्स परिवार मोठं काम करू शकले.
5/ 10
5. मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी प्लॅनची घोषणा केली. गुजरातच्या जामनगरमध्ये 5000 एकर जागेत धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येत आहे. यासाठी 60 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.
6/ 10
6. रिलायन्स इंडस्ट्रील ग्लोबल होणार, अशी घोषणा करण्यात आली. यासिर अल रुमैयन हे सौदी अराम्कोचे चेअरमन रिलायन्सला सामील झाल्याने ही प्रक्रिया सुरू झाल्याचं अंबानी यांनी सांगितलं.
7/ 10
7. सौदी अराम्कोबरोबरचा व्यवहार वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.
8/ 10
8. रिलायन्स व्हॅल्यू चेन पार्टनरशिप आणि फ्यूचर टेक्नॉलॉजीवर या वर्षात 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा अंबानी यांनी AGM मध्ये केली.
9/ 10
9. पर्यावरणस्नेही न्यू एनर्जी बिझनेस सुरू करण्याची घोषणाही मुकेश अंबानी यांनी केली. रिलायन्स न्यू एनर्जी कौन्सिल स्थापन करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2021 मध्येच 100 गिगावॉट क्षमतेची सोलर एनर्जी निर्माण केली जाईल.
10/ 10
10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत