

Amazon वर 4 मे पासून सुरू झालेल्या Summer Sale मध्ये महागड्या फोनवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. महागडा फोन स्वस्तात खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर OnePlus 6T हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.


OnePlus 6T हा स्मार्टफोनची बाजारपेठेत 37,999 रुपये किंमत आहे. पण Amazon च्या या सेलमधून हाच फोन जर तुम्ही ऑनलाईन खरेदी केल्यास तुम्हाला 8,000 रुयांची सूट मिळेल. म्हणजेच OnePlus 6T हा फोन तुम्हाला 29,999 रुपयांत खरेदी करता येईल.


OnePlus 6T मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोअरेज देण्यात आलं आहे. याआधी Amazon च्या Feb Phone Fest मध्ये हा स्मार्टफोन 34,999 रुपये किमतीला उपलब्ध करून देण्यात आला होता.


OnePlus 6T च्या 8GB/128GB या व्हेरिएंटची मुळ किंमत 32,999 आणि 8GB/256GB या व्हेरिएंटची मुळ किंमत 36,999 रुपये आहे. Amazon च्या या सेलमध्ये या दोन्ही वेरिएंटवर 9,000 रुपयांची सूट दिली जात आहे.


फोन खरेदी करताना तुम्ही जर SBI क्रेडिट-डेबिट कार्ड वापरणार असाल तर 10 टक्के म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि Amazon Pay ज्या माध्यमातून खरेदी करणाऱ्यांना 1,465 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.