

मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. Nokia 5.1 प्लस आणि Nokia 6.1 प्लसच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून मोबाईल बुक करू शकता.


स्वस्तात मस्त अशा गोष्टींकडे सध्या ग्राहकांचा ओढा वाढताना दिसत आहे. त्याचा विचार करता नोकियानं दोन मस्त स्मार्ट फोन लॉन्च केले आहेत.


13, 199 रूपये किंमतीचा Nokia 5.1 प्लस 9,999 रूपयांना उपलब्ध आहे. तर, 17,600 रूपये किंमतीचा Nokia 6.1 प्लस 14,999 रूपयांना उपलब्ध आहे.


Nokia 5.1 प्लसमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. याचा प्रोसेसर पी60 आहे. कॅमेऱ्याचा विचार केल्यास 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 3060 mAh आहे. ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सध्या Nokia 5.1 प्लस उपलब्ध आहे.


Nokia 6.1 हा 4GB रॅममध्ये उपलब्ध असून त्याच्यासोबत ऑक्टाकोर चिपसेट देण्यात आला आहे. Nokia 6.1 प्लसचा इंटरनल स्टोअरेज 64GB आहे. मोबाईलची बॅटरी 3060 mAh एवढी आहे. Nokia 6.1 प्लसचा कॅमेरा १६ मेगापिक्सल प्रायमरी आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी आहे. ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये हे मोबाईल उपलब्ध आहेत.