

नवीन फोन विकत घ्यायचा असले तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण HMD ग्लोबलची कंपनी नोकियाने त्यांच्या तीन फोनच्या किंमतीत घट केली आहे. अशात जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला नोकियाने उत्तम संधी दिली आहे. Nokia 3.1, Nokia 5.1 आणि Nokia 6.1 फोनच्या किंमतीत कमालीची घट करण्यात आली आहे. या फोनच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.


Nokia 6.1 : या स्मार्टफोनला तुम्हाला आत फक्त 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज आहे. ज्यावेळी फोन लाँच झाला तेव्हा या फोनची किंमत 13,499 रुपये होती. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 64GB इटरनल स्टोअरेज असलेल्या फोनची खरी किंमत 15,499 रुपये होती. आता 13,999 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे.


Nokia 3.1 : कंपनीने त्यांच्या या फोनमध्ये 2 हजारांची घट केली आहे. घट केल्यानंतर या फोनला 8,999 रुपयांमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं. फोन लाँचिंगच्या वेळी या फोनची किंमत 11,999 रुपये होती. ऑक्टोबरमध्ये फोनच्या किंमतीत 2 हजारांनी घट करण्यात आली होती.