

Flipkart वर सुरू असलेल्या शिओमी कंपनीचं Mi Days सेलचा 30 जानेवारी (आज) शेवटचा दिवस आहे. तुम्हाला जर शिओमी कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये योग्य संधी मिळत आहे.


शिओमीच्या स्मार्टफोनवर 4 हजारापर्यंतचं दमदार डिस्काऊंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना नो कॉस्ट EMIची ऑफरसुद्धा मिळत आहे. कोणत्या स्मार्टफोन किती रुपयांचं डिस्काऊंट मिळत आहे जाणून घ्या.


Xiaomi Redmi-6 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनला 7,499 रुपयात खरेदी करू शकता तर 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोअरेज असलेला फोन 8,499 रुपयात उपलब्ध आहे. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफरसुद्धा देण्यात येत आहे. यात तुम्हाला फक्त 500 रुपये भरून फोन विकत घेता येईल. या फोनवर 7,850 रुपये एक्सचेंज ऑफर दिली आहे.


भारतातील सगळ्यात प्रसिद्ध Redmi Note 6 pro फोनला तुम्ही Mi Days सेल अंतर्गत 12,999 रुपयात खरेदी करू शकता आणि तुम्हाला EMI वर खरेदी करायचा असेल 432 रुपये दरमहा भरावे लागतील. त्याचबरोबर तुम्ही 12,600 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरमध्येही हा फोन खरेदी करू शकता.


तुम्हाला फोटो काढायची आवड असेल आणि त्यासाठी तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर Poco F1 चा 256GB इंटरनल स्टोअरेज असलेला फोन तुम्ही 27,999 खरेदी करू शकता. त्याचबरोबर 14,900 रुपयांचं एक्सचेंज ऑफर आणि दरमहा 930 रुपयांचा EMI वरदेखील हा फोन तुम्हाला विकत घेता येईल.