शाओमीने (Xiaomi) Mi 11 सीरीजचे तीन स्मार्टफोन Mi 11X Pro, Mi 11 X आणि Mi 11 Ultra लाँच केले आहेत. यात सर्वात महाग आणि प्रीमियम फोन Mi 11 ultra आहे. कंपनीने भारतात Mi 11 Ultra सिंगल वेरिएंट 12GB RAM+256GB स्टोरेजमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत 69,999 रुपये आहे. सध्या कंपनीने या फोनच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.