भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांना डिस्काउंट ऑफर करत आहे. अनेक जण सणाच्या काळात गाडी खरेदी करणं पसंत करतात. त्यामुळे फेस्टिव्ह सीजनमध्ये, कंपनीने प्रीमियम ते बजेट सेगमेंटपर्यंत अनेक गाड्यांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. काही गाड्यांवर 50 हजारहून अधिक डिस्काउंट देण्यात येत असून या ऑफर्स केवळ या महिन्यापर्यंतच आहेत.