भारतात दररोज नवीन फोन लॉन्च होत आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एकाच वेळी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. दरम्यान, जर तुम्हीही नवीन फोन घेण्याचं ठरवलं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही फोनची यादी घेऊन आलो आहोत, जे या आठवड्यात लॉन्च झाले आहेत. Redmi, Infinix हे लोकप्रिय ब्रँड या यादीत आहेत.
iQoo Z6 मध्ये 6.64-इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो आणि 240Hz चा सॅम्पलिंग रेट देखील आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iQOO Z6 ची सुरुवातीची किंमत सुमारे 19,818 रुपये आहे.
Infinix Note 12 Pro 4G मध्ये 60Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, एक डेप्थ सेन्सर आणि एक AI लेन्स मिळेल, फोनच्या पुढील बाजूस सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे. किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास हा स्मार्टफोन 16,999 रुपयांना लॉन्च केला गेला आहे.
Redmi Note 11 SE मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह 6.43-इंच 1080p सुपर AMOLED डिस्प्ले आणि मध्यभागी एक होलपंच कट-आउट देखील आहे. हे 6GB LPDDR4X रॅम आणि 64GB UFS 2.2 स्टोरेजसह MediaTek Helio G95 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी मिळते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Redmi Note 11 SE ची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
iQoo Z6x मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.58-इंच फुल HD+ LCD स्क्रीन आहे. यात OriginOS Ocean सह Android 11 आहे. तसेच, हा स्मार्टफोन 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह येतो. यात 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा तसेच 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे 13,983 रुपये आहे.