

तुमची कार तुम्हाला कमी मायलेज देतेय का? पण त्यासाठी कार बदलायची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो कशी घ्यायची काळजी ते.


गियर बदलताना घ्या काळजी - पेट्रोलवर चालणाऱ्या कारचे गियर्स 2500 आरपीएमच्या आधी बदलावे लागतील. तर डिझेलवर चालणाऱ्या कारचे 2000 आरपीएमच्या आधी बदलावे लागतील. लांबच्या प्रवासावर जात असाल आणि एकच स्पीड ठेवायचा असेल तर टाॅप गियरवरच ठेवा.


स्पीडवर लक्ष ठेवा - जास्त स्पीड ठेवलात तर कारच्या इंजिनावर प्रेशर येईल. योग्य स्पीड ठेवून इंधनाचीही बचत होते. ट्रॅफिकमध्ये इंजिन सुरू ठेवू नका.


इंजिनावरचा एअर फिल्टर तपासा - एअर फिल्टर नेहमीच चेक करा. त्यात धूळ बसली की परिणाम इंजिनाच्या क्षमतेवर होतो. तो वेळोवेळी साफ करा.


कारच्या वर कॅरियरवर जास्त सामान ठेवू नका. त्यामुळे हवेचा दाब वाढतो आणि कार चालवायला जास्त पाॅवर लागते.


कारमध्ये अति सामान ठेवू नका. 48 किलो सामान ठेवल्यानं इंधनाचा खर्च 2 टक्के वाढतो. कारला लागणाऱ्या वस्तू मात्र कारमध्ये ठेवा.