

प्रमोशनसाठी केले जाणारे कॉल आणि मेसेज नक्कीत कोणाला आवडत नाही. अशा प्रमोशनसाठी येणाऱ्या कॉल्समुळे कधी-कधी फार संताप होतो. मेसेजबद्दल बोलायचं झालं तर फोनमधील इनबॉक्स जास्त प्रमाणात प्रमोशन मेसेजनेच भरलेलं असतं. या व्यतिरिक्त बँकेचे ऑफरचे मेसेज आणि कॉल्सने तुम्ही कधी तरी त्रस्त झाला असालच म्हणूनच जिओनं खास Do Not Disturb (DND) नावाची सेवा दिली आहे. यामध्ये तुम्ही असे कॉल आणि मेसेज ब्लॉक करून ठेवू शकता.


सर्व टेलिकॉम कंपन्या DND सेवा देतात. पण जिओ कंपनीनं ही सेवा My Jio अॅपवर दिली आहे. DND सेवा Activate/Deactivate कशी करावी याबद्दल जाणून घ्या.


इथे तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील. इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार DND पर्याय अॅक्टिव्हेट करू शकता. तुम्हाला जर बॅकिंगचे प्रोमोशनल कॉल, मेसेज ब्लॉक करायचे असतील तर ON बटनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सर्व प्रोमोशनल कॉल आणि मेसेज ब्लॉक करायचे असतील वरील मुख्य बटनावर क्लिक करा.