भारतात अॅपल वापरणाऱ्यांसाठी आणि चाहत्यांसाठी आता चांगली बातमी आहे. लवकरच भारतातील फोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं वृत्त दिलं आहे. हे फोन फॉक्सकॉन स्थानिक युनिटमार्फत तयार केले जाणार आहेत. हे हाय एंड आयफोन पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहेत. भारतात आयफोन एक्सआरची सुरुवातीची किंमत 56 हजार तर एक्सएसची किंमत एक लाख रुपयापर्यंत असेल.