अॅपलने एक दिवस अगोदर त्यांची कमाई 2018 च्या शेवटच्या तिमाही अंदाजापेक्षा कमी राहणार असं म्हटलं होतं. सुरुवातीला अॅपलनं 89 अब्ज डॉलरचा अंदाज वर्तवला होता. मात्र बुधवारी कंपनीने 84 अब्ज डॉलरचा अंदाज वर्तवला. गेल्या 16 वर्षांमध्ये पहिल्यांदा अॅपलने आपल्या अंदाजे उत्पन्नात घट केली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले.
अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी या घटनेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. टिम कुक यांनी कंपनीच्या शेअरहोल्डर्सना सांगितले होते की, 'व्यापार युद्धाचा परिणाम आता दिसत आहे यामुळे ग्राहकांचा विश्वासही डळमळीत होऊ लागला आहे.' अॅपलला जरी मोठा फटका बसला असला तरी कंपनी दुसऱ्या क्षेत्रात नवी शाखा उघडू शकते. कंपनीकडे यासाठी पुरेसा पैसा आहे.