अॅपलची उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांचा आधार घ्यावा लागणार नाही. अॅपल भारतात त्यांचे स्वत:चे स्टोअर सुरू करणार आहे.
2/ 5
आतापर्यंत कंपनी रिटेल कंपन्या, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांची विक्री करत होती. आता अॅपलची स्टोअर्स सुरू होणार आहेत.
3/ 5
सरकारने अॅपलला ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीला पहिल्यांदा ऑफलाइन स्टोअर उघडावं लागत होतं. पण आता ऑनलाइन स्टोअर उघडता येईल.
4/ 5
सरकारनं बुधवारी झालेल्या कॅबिनेट मिटिंगनंतर काही अटी ठेवून निर्णय घेतला आहे. ऑफलाइन स्टोअरसाठी असलेला 30 टक्के लोकल सोर्सिंगचा नियम ऑनलाइन स्टोअरसाठी लागू करण्यात आला आहे. यामुळं त्यांचाय स्टोअरसाठीचा खर्च कमी होईल.
5/ 5
आता मालाची निर्यात सुद्धा लोकल सोर्सिंगमध्ये जोडण्यात येईल. यामुळं अॅपल सारख्या कंपन्या भारतात कॉन्ट्रॅक्ट मॅन्यू फॅक्चरर्ससोबत मॅन्यूफॅक्चरिंग बेससुद्धा सुरू करू शकतील. याशिवाय प्रोडक्ट एक्सपोर्ट करता येतील. परिणामी उत्पादनांची किंमतही कमी होईल.