Instagram वर फोटो-व्हिडीओ चुकून डिलीट झाले? असे करा Restore
Instagram वर चुकून तुमचा कंटेंट फोटो-व्हिडीओ डिलीट झाले तर चिंता करण्याची गरज नाही. तुमच्याकडे संपूर्ण डेटा रिस्टोर करण्याचा ऑप्शन असतो. परंतु इन्स्टाग्राम App वरुन डिलीट झालेला कंटेंट रिस्टोर करण्याची सुविधा केवळ अशा युजर्सकडे असते, जे App च्या लेटेस्ट वर्जनचा वापर करतात.
|
1/ 7
Instagram च्या Recently Deleted पर्यायात गेलेला कंटेंट 30 दिवसांत डिलीट होतो.
2/ 7
तुम्ही 30 दिवसांपर्यंत डिलीट झालेला कंटेंट Recently Deleted फोल्डरमधून परत मिळवू शकता. तसंच कंटेंट कायमसाठी डिलीट करण्याचाही पर्याय मिळतो.
3/ 7
सर्वात आधी Instagram ओपन करा, त्यानंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
4/ 7
त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन लाइन्सवर क्लिक करा. त्यानंतर Settings वर क्लिक करा आणि Account मध्ये जा.
5/ 7
इथे अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी Recently Deleted वर क्लिक करा.
6/ 7
आता जो कंटेंट रिस्टोर करायचा आहे, त्यावर क्लिक करा.
7/ 7
त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या 3 डॉटवर क्लिक करा. आता डिलीट किंवा रिस्टोर जो पर्याय हवा त्यावर क्लिक करा.